श्री. ऋषिकेश गुरुजी !
वैदीक ज्योतिष आणि वास्तु विश्वात एक प्रख्यात नाव. जीवनात येणाऱ्या समस्या निवारण करण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शक. परम पूज्य श्री. गोविंदगिरी महाराज (कोषाध्यक्ष, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास) यांच्या आळंदी येथील वेदपाठशाळेत ८ वर्षे वैदिक शिक्षण व गेली १३ वर्षे पौराहित्य क्षेत्रात अनुभव, वास्तु व ज्योतिष अभ्यास सखोल चिंतन. आत्ताच्या काळानुरूप लागू होणाऱ्या विषयांवर योग्य मार्गदर्शन हे विशेष. आरोग्य, आर्थिक उत्पन्न आणि ज्योतिष यावर अभ्यास त्यानुसार वास्तुरचना याचा संगम कसा घालावा असा सुयोग्य विचार. गत १३ वर्षांमध्ये अगणित लोकांनी श्री. ऋषिकेश गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे जीवन प्रगतीपथावर नेले आहे.